…तर मला फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापैकी पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत अजित पवारांनी वाढत्या रुग्णसंख्येबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

रुग्णसंख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवारांना फोन केला तरीही बेड मिळायचे नाहीत, त्या वेळी काय करणार? असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मीसुद्धा लॉकडाऊनच्या विरोधात आहे; पण सध्या संख्या ज्या पद्धतीने वाढते आहे ते पाहता १०० टक्के हॉस्पिटल ताब्यात घेतली तरीही बेड मिळणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं. लोक ऐकतच नाहीत, कडक निर्बंध घातले तरीही…एखाद्या घरात रुग्ण आढळले तरीही त्या घरातली लोक गावभर फिरतात.

काही उपयोग होत नाही. असंच सुरू राहिलं तर रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जाईल आणि उद्या मला फोन केला तरीही बेड मिळणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button