संभाजी राजेंच्या आंदोलनाची अजित पवारांकडून तात्काळ दखल, ‘सारथी’ ला पुन्हा स्वायत्तता

Ajoit Pawar-Sambhaji Raje-Sarthi

पुणे : राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजातील तरुण-तरुणीच्या विकासासाठी स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) (Sarthi) या संस्थेची स्वायत्ता काढून घेण्यात आली होती. याबाबत गेले वर्षभर शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होते. याच मागणीसाठी गुरुवारी खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje)सारथीच्या कार्यालयापुढे एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसले होते. अखेर त्यांच्या आंदोलनाची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दखल घेतली. त्यांच्या आदेशानुसार कालच राज्य सरकारने सारथीला स्वायतत्ता बहाल केली.

खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात येऊन सारथी संस्थेच्या बाहेर आंदोलन केले. मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांनी सारथी संस्थेची सर्व जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली. सारथीची जबाबदारी पवार यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी देखील तातडीने संस्थेला निधी उपलब्ध करून दिला. स्वत: भेट देऊन अडचणी समजून घेतल्या, संचालक मंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. अजित पवार यांच्यामुळे अखेर सारथी संस्थेत बदल होण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, संभाजी राजे यांनी स्वायतत्ता बहाल केल्यानंतर नाराजी व्यक्त केली. ‘सारथी’ला आधी जाणीवपूर्वक बदनाम करून स्वायत्तता घालवली. हि स्वायत्तता टिकविण्यासाठी समाजाच्या वतीने आम्ही अनेक आंदोलने केली, जीवनात पहिल्यांदा ‘सारथी’च्या कार्यालयासमोर रस्त्यावर बसून लाक्षणिक उपोषण केले. तसेच हा मुद्दा आजपर्यंत सातत्याने लावून धरल्यामुळे आज ‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले गेल्याचे समजते. अजून बरेच टप्पे बाकी आहेत. सारथी बाबत निर्णय घेण्यासंबंधीचे अधिकार संचालक मंडळाला देण्यात येतील असे एका ‘जी आर’ द्वारे सांगण्यात आले आहे.

मराठा समाजाने आत्ताच याबाबत समाधानी न होता, नेमकं कोणाच्या सांगण्यावरून सारथी बंद करण्याचा घाट घातला गेला? याची शहानिशा करून घेतली पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने असलेली आणि मराठा समाजाला दिशा देणारी ही संस्था ठप्प केली गेली. विविध प्रकारचे आरोप करून तिला बदनाम केले गेले. मराठा समाजाचे अमूल्य असे एक ते दीड वर्ष अक्षरशः वाया घालवले. भ्रष्टाचार आणि तत्सम आरोप सिद्ध तरी करा किंवा जाणीवपूर्वक षडयंत्र रचणाऱ्या मंत्रालयीन अधिकाऱ्याला सस्पेंड तरी करा अशी मागणी या निमित्ताने समाजाच्या वतीने आम्ही करतो. असे संभाजी राजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER