शरद पवारांच्या पाठोपाठ अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, उदय सामंत यांचेही दौरे रद्द

Jayant Patil -Supriya Sule - Ajit Pawar - Uday samant

मुंबई : कोरोना (Corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) , जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये आणि कोरोना नियमांचे पालन केले जावं यासाठी त्यांनी हे दौरे रद्द केले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच आज सकाळी त्यांनी नागरिकांच्या भेटी घेणेही टाळले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर पवार यांनी हा निर्णय घेतला आहे .

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उद्यापासूनचे म्हणजे 23 फेब्रुवारीपासूनचे पुढचे सर्व दौरे रद्द करण्यात येत असल्याचं ट्विटरवरून स्पष्ट केले आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी उद्या होणारा त्यांचा हिंगोली दौरा रद्द केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER