शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नांना अजित पवारांची साथ; सातारा हद्दवाढीचा प्रश्न मार्गस्थ

Ajit Pawar-Shivendra Raje

सातारा : भाजप (BJP) आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje) यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या साथीने ५० वर्षे जुना सातारा हद्दवाढीचा प्रश्न मिटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्याच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारच्या हद्दवाढीची काढलेली ऑर्डर शिवेंद्रराजे भोसले यांच्या ताब्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा:- ‘पिंपरी-चिंचवड’ बालेकिल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अजित पवारांची नवी रणनीती?

गेले अनेक वर्षांपासून सातारा हद्दवाढीचा विषय प्रलंबित होता. मात्र, तब्बल ५० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अजित पवार यांच्या पुढाकारातून हा विषय मार्गी लागला आहे. या निर्णयामुळे भविष्यात सातारा ही महापालिका होण्यासाठी मदत होईल, या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

Satara boundary

ग्रामपंचायत आणि दोन ग्रामपंचायतींचा अंशतः भाग यात समाविष्ट करण्यात आला आहे. “साताऱ्याच्या हद्दवाढीचा प्रश्न १९७१ पासून प्रलंबित होता. पुणे जिल्ह्यापेक्षा सातारा जिल्ह्याने पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीला खूप प्रेम दिलं आहे. त्यामुळे सातारा हद्दवाढ हा पण प्रश्न लवकरच सोडवू.” असं आश्वासन अजित पवार यांनी जून महिन्यातच दिलं होतं. त्याप्रमाणे अजित पवार यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. गेल्या १० वर्षांपासून सातारा शहराच्या हद्दवाढीचा विषय फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा चर्चेत आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही व्हायची राहिली होती. पण, सत्ता बदलामुळे हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आला व अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सातारा हद्दवाढीवर शिक्कामोर्तब केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER