सानुग्रह अनुदानासाठी नपावर काळे झेंडे फडकवणाऱ्यांना अजित पवारांनी बोलावले चर्चेला

Ajit Pawar

बारामती :- दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) मिळावे या मागणीसाठी नगरपालिकेवर काळे झेंडे फडकावणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी चर्चेसाठी बोलावले आहे. याबाबत आज बैठक होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामतीत पहिल्यांदाच नगरपालिकेवर आज काळे झेंडे  फडकले. आज दुपारी बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान (बोनस) मिळवण्यासाठी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे दाखवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून हे कर्मचारी आंदोलन करत आहेत; पण त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नव्हती. नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांपैकी कोणीही त्यांना भेटायला आलं  नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आलं  आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आज थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे फडकवून आंदोलन केले.

ही बातमी पण वाचा : दिवाळीत कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा : अजित पवारांचे आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER