आव्हाडांच्या झोपेवरून अजित पवारांच्या कानपिचक्या

शरद पवार रात्री 2 वाजता झोपले तरी सकाळी 7 वाजता तयार असतात

Jitendra Awhad-Ajit Pawar

पुणे :- अजितदादा सकाळी लवकर आमची झोप नाही होत. दादांचा जेवढा उरक आहे, तेवढा आमचा नाही. त्यामुळे दादा यानंतर कोणताही कार्यक्रम किमान सकाळी ११ च्या नंतर घेत जा, अशी विनवणी गृहनिर्माणमंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर अजित पवार यांनी आव्हाड यांना चांगलेच चिमटे काढले आणि जरा लवकर उठत जा, असा सल्ला पवार यांनी आव्हाडांना दिला.

पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड एकत्र आले होते.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

‘दादांचा जेवढा उरक आहे, तेवढा आमचा नसेल कदाचित. कारण दादांनी लावला सकाळी १० वाजता कार्यक्रम. मी निघालो ठाण्याहून. काल रात्रीचा माझा कार्यक्रम. कारण मी बंगल्यावरच बसतो १०-११ वाजेपर्यंत. तेव्हा दादा, जरा यापुढचे कार्यक्रम ११ नंतर घेतलेत तर आमची झोप पूर्ण होत जाईल. प्रवासाचा वेळही तेवढा कमी होईल’ तसेच, ‘तुम्हाला झोप लागते पाच तास. आम्हाला लागते सहा-सात तास. तेवढा आमचाही जरा विचार करा.’ असे आव्हाड म्हणाले.

व्यक्तिशः माझा पगार मी सामाजिक गोष्टींसाठी वापरेन- रोहित पवार