‘अजित पवार लोकांना धमकी देणे बंद करा, नेतेगिरी कामात दाखवा’, निलेश राणेंचा सल्ला

Ajit Pawar - Nilesh Rane

मुंबई :- अजित पवार (Ajit Pawar) आपण रोज उठून लॉकडाऊनची धमकी देता पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे, पुण्यात (Pune) कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील, लॉकडाऊन (Lockdown) हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही, असे सांगत भाजपचे (BJP) नेते व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ट्वीटरद्वारे निशाणा साधला आहे.

अजित पवार आपण रोज उठून लॉकडाऊनची धमकी देता पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे, पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील, लॉकडाऊन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही.

ही बातमी पण वाचा : आमदार असावा तर  निलेश लंके सारखा ;काेरोना बाधित रुग्णांसाठी घेतला पुढाकार 

‘अजित पवार काही लाज शिल्लक आहे की नाही तुमच्यात… धमकी द्यायची नाही लोकांना, आता लोकं ऐकायच्या मनःस्थितीत नाही, राज्य सरकारने वाट लावली महाराष्ट्राची. तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या,” असे राणे यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button