खडसेंच्या संभाव्य पक्षप्रवेशावर अजित पवारांनी मौन सोडले, म्हणाले…

Eknath Khadse-Ajit Pawar

पुणे :- भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यावर राष्ट्रवादीकडून अद्याप कुठलेच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिल्यांदाच यावर मौन सोडले. राजकारणात अनेकदा भेटीगाठी चालूच असतात. भेट झाली म्हणजे नक्की काही तरी काळंबेरं आहे असा अर्थ होत नाही. भाजप सत्तेत असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या नेत्यांना भेटायचो. तुम्ही मला गेली कित्येक वर्ष ओळखता, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. भाजप सत्तेत असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या नेत्यांना भेटायचो. तुम्ही मला गेली कित्येक वर्ष ओळखता, असंही अजित पवार म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल आपल्याला काहीही माहित नाही. जेवढं माहित होतं तेवढं तुम्हाला सांगितलंय, असंही सांगायला ते विसरले नाही.

दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले की, “ योजनेची चौकशी मुद्दाम करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सभागृहात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत. राजकीय सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे? कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला? कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं विधान केलं होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER