अजित पवार सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांनी दिली समज

Ajit Pawar - Chandrakant Patil

मुंबई : अजित पवारानी यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिला. (BJP leader Chandrakant Patil take a dig at DCM Ajit Pawar)

ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असे पाटील म्हणाले होते. त्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी जागे असताना की झोपेत?

आज (रविवारी) कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांचा कडक समाचार घेतला. म्हणालेत – झोपेत असताना सरकार कसे आणायचे, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. शरद पवार झोपेत असताना तुम्ही सरकार स्थापन करुन मोकळे झाले होतात. मात्र, अजित पवार यांना त्यांनी काल काय केले होते, हे लक्षात रहात नाही!

अजित पवार यांना तलवारीचा धाक दाखवून कोणी शपथविधीसाठी नेले नव्हते. त्यामुळे त्यांनी ज्या भाजपसोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, त्यांच्याविषयी काय बोलतोय याचे भान अजित पवार यांनी बाळगावे.

अजित पवार, तुम्हाला राष्ट्रवादीचे २८ आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलोच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती आहे, असा टोमणा चंद्रकांत दादांनी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button