‘हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत, आता काय त्यांच्यापुढे डोके फोडून घ्यावं?, अजित पवार संतापले

पुणे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना (Corona) काळात सुरुवातीपासूनच सदैव दक्षता घेतली आहे. आताही कोरोनावर लस आली असली किंवा राज्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं असलं तरी अजितदादा कधीही कोरोनाच्या सेफ्टीकडे दुर्लक्ष तर नाहीच तर, सर्व सेफ्टी अगदी काळजीने वापरतात.

मात्र, जनजागृतीसाठी कितीही जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही अशा ढिगभर जाहीराती केल्यात तर काही लोकांना आवरणे कठीण असते. असेच चित्र अजित पवार यांना प्रत्यक्षात दिसले. तेव्हा ते संतापलेच.

आज राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आयोजित कार्यक्रमात मास्क नसलेले लोक पाहून पवार चांगलेच भडकले. ‘हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का,’ असा आपल्या खास शैलीत त्यांनी संताप व्यक्त केला.

अजित पवार यांनी आज राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी करोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले.

अजित पवारम्हणाले, कोरोनाला हसण्यावारी घेऊ नका. आपण करोनाची काळजी घेणे आवश्यक आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. येथेही हे बघा अनेक पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत. ज्यांनी मास्क लावले आहेत, त्यातील अनेकांनी येथे वाटलेले मास्क लावल्याचे दिसून येत आहे. असे करू नका. ब्रिटनमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या,’ असे आवाहनही त्यांनी केले.

तसेच अजित पवार यांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिणांमवरही भाष्य केले, ते म्हमाले,‘कोरोना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचेच हाल झाले. त्यातूनही मार्ग काढत राज्य सरकारने उपाययोजना केल्या. पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या काळात आर्थिक विकासाचा दर खाली आला. सरकारी तिजोरीत पैसे येणे कमी झाले. अर्थसंकल्पात जे ठरविले, तेवढेही पैसे येत नव्हते. केंद्र सरकारकडे २५ हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. तरीही आपले महाविकास आघाडीचे सरकार वचन पाळणारे सरकार आहे. उपलब्ध पैशांत कामे सुरूच ठेवली. राज्य सरकारचा सर्वांत मोठा खर्च पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. दरमहा सुमारे १२ हजार कोटी रुपये यासाठी लागतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून कामे करावी लागतात. असे असले तरी कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे काळजी घेणेही आवश्यक असल्याचे आवाहन पवार यांनी केले.

ही बातमी पण वाचा : अजितदादांचा गौप्यस्फोट : जे साहेबांना सोडून गेले ते पडले; आता मोठा पक्षप्रवेश घेऊ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER