कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झाले , काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?अजितदादांचे खडेबोल

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे . मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली हे सांगू का? असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही त्यावरून विरोधक टीका करत आहेत. आधी विरोधकांनी मुंडेंवर आरोप केले. नंतर तोंडघशी पडल्यावर आता वेगळा आरोप केला आहे. विरोधकांचे टीका करणं हे काम आहे. पण ती कोणत्या पातळीपर्यंत असावी याला मर्यादा आहेत, असे सांगतानाच मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली सांगू का? असा इशारा त्यांनी दिला. कुणाला किती मुलं होती. कुणाचं लग्न झाले होतं, झालं नव्हते , हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे, सांगायलाच हव्या का? असा सवालही त्यांनी केला.

तसेच अजित पवार यांनी जातीनिहाय जनगणनेवरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. जातिनिहाय जनगणनेची मागणी खूप जुनी आहे. अनेक वर्षांपासूनची आहे. मागच्या लोकसभेतही ही मागणी करण्यात आली होती. त्यामुळे जनगणना करायची की नाही हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. तो लोकसभेचा अधिकार असून केंद्राने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच शेतकरी आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचेही पवार म्हणले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER