अजितदादांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा – चंद्रकांत पाटील

Ajit Pawar - Chandrakant Patil

पुणे :- गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील शाब्दिक चकमक रंगली आहे. आज चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा अजितदादांवर शब्दांचे बाण सोडले आहेत. अजितदादांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांनी एकतर पुण्यातून राज्य चालवावं अथवा पुण्यासाठी नवा पालकमंत्री द्यावा, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना (Ajit Pawar) डिवचले आहे.

पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, अजितदादांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. ते सक्षम आहेत. मी त्यांचं सतत कौतुकच केलं आहे. ते सकाळी ७ वाजताच मंत्रालयात दाखल होतात. बाकीचे मंत्रिगण ११ वाजता येतात. हे मंत्री ११ वाजेपर्यंत फोनही उचलत नाहीत. आता अजितदादांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा. त्यांनी पुण्यातून राज्य चालवल्यास ते लोकांना सहज उपलब्ध होतील. लोकांच्या समस्या अधिक वेगाने आणि लवकर सुटतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यात आणि विशेषकरून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा वेळी भाजप सामाजिक संघटना म्हणून कार्य करत आहे. अडीचशे बेड्सचे विलगीकरण सेंटर उभारण्यात आले आहे. ऑक्सिजन बेड्सची कमतरता आहे. नाशिकच्या घटनेवर कुठल्याही चौकशीशिवाय निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. चूक तांत्रिक आहे की मानवी आहे हे अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. पुण्यातील ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवू नये. सरकार म्हणून तुम्ही काय करत आहात हे आधी सांगा, असं सांगतानाच सीरम इन्स्टिट्यूटने महाराष्ट्राला आधी प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

ही बातमी पण वाचा : उपमुख्यमंत्रीपद गेल्यावर तुमच्याकडे नारळ पाणी विकणारा पण येणार नाही, निलेश राणेंचा अजितदादांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button