अजितदादांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा, नाही तर … : चंद्रकांत पाटील

Ajit Pawar - Chandrakant Patil

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ‘धावता’ दौरा करून नुकसानाचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या धावत्या दौऱ्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीकास्त्र सोडले आहे .तसेच मुख्यमंत्र्यांना एक सल्ला देऊ केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काही माझे शत्रू नाहीत; पण त्यांनी आठ दिवस तिथं जाऊन राहावं. तिकडे वातावरणही चांगले आहे. हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन काम करत नाही, असे पाटील म्हणाले. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही टोला लगावला.

इतकेच नाही तर अजित पवारांनी उद्धव ठाकरेंनाही सल्ला द्यावा. तीन तासांत पाहणी होत नाही. अजितदादांनीही आठ दिवस कोकणात जावं आणि त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत, असंही पाटील यांनी म्हटले . महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यानंतर अजित पवारांना विचारण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र, सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को. आपल्या पायाशी काय जळतंय ते पाहा, अशा शब्दात पाटील यांनी अजितदादांवर निशाणा साधला . संजय राऊत काहीही म्हणू शकतात, ते फारच मोठे विद्वान आहेत. हे प्रकरण कोर्टात आहे. त्यावर मी बोलू शकणार नाही, असे पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button