एकदा बघाच…’हेलिकॉप्टर’ शॉट नंतर आता क्रिकेटमध्ये खेळला जातोय ‘अजित पवार’ शॉट!

Ajit Pawar shot

नवी दिल्ली :- क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूची एक वेगळी खेळण्याची पध्दत असते. तसेच, या शॉटना खेळाडूंच्या स्टाईल प्रमाणे नावेही दिली जातात. आधी भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा ‘हेलीकॉप्टर’शॉट चांगलाच प्रसिद्ध झाला होता. मात्र पहिल्यांदाच एका राजकारणी नेत्याच्या नावानं एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात तुम्ही अजित पवार हे नाव हमखास ऐकले असेल, पण तुम्ही अजित पवार शॉट कधीही पाहिला नसेल.

आयसीसीनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ अपलोड केला होता. हा व्हिडीओ होता न्यूझीलंड मध्ये होत असलेल्या एकदिवसीय फोर्ड ट्रॉफी स्पर्धेचा. या स्पर्धेत ग्लेन फिलिप्स याने आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीची दाणादाण उडवली. या सामन्यात ऑकलंडच्या ग्लेनने एक अनोखा रिव्हर्स शॉट खेळला. फिलिप्सचा हा अनोखा रिव्हर्स शॉट पाहून विरोधी संघातील खेळाडू आणि प्रेक्षकही थक्क झाले.

फिलिप्सनं षटकारासाठी लागवलेला हा शॉट क्रिकेटमध्ये पहिले कधीही पाहायला मिळाला नव्हता की या शॉटची दाखल खुद्द आयसीसीनेही घेतली. आयसीसीने ट्विटरवर फिलिप्सच्या या शॉटचा व्हिडिओ शेअर करत ‘या शॉटचे नाव’ विचारले असता एका नेटकाऱ्याने याला थेट ‘अजित पवार शॉट’ ची उपमा देऊन टाकली.