‘आमच्याकडे बहुमत’, राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या भाजपला अजितदादांनी खडसावले

Ajit Pawar

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना पोलीस विभागातील रॅकेटबाबत माहिती देण्यासाठी काही जणांचे फोनवरील संभाषण दिले आहे. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. परवानगी मिळाली तरच फोन टॅपिंग करता येत. तसंच राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या भाजपला त्यांनी आमच्याकडे बहुमत आहे, अशी आठवण करुन दिली. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, आज सायंकाळपर्यंत मुख्य सचिव त्यांना अहवाल सादर करणार आहेत. अशी माहिती अजित पवारांनी दिली.

विरोधकांनी कितीही हातपाय मारले तरी राज्य सरकार स्थिर आहे. सरकार नियमानुसार काम करत आहे. विरोधकांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं सांगत राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित आहे. विरोधक सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहे. पण मला त्यांना सांगायचंय की महाविकास आघाडीक़े पूर्ण बहुमत आहे. आमच्या मित्रपक्षाचे आमदार आमच्यासोबत आहे. साहजिकच महाविकास आघाडी पूर्णबहुमताने सत्तेत आहे. सीएम आणि आम्ही राज्सपाल यांना भेटणार होतो पण राज्यपाल बाहेर आहेत,  असं अजित पवार म्हणाले.

अधिकारी बदल्यांच्या रॅकेटवरुन विरोधी पक्ष आरोप करतो आहे. पण त्या बदल्या झाल्याचं नाहीत. ज्या बदल्या रश्मी शुक्ला यांनी सांगितले त्या बदल्या झालेल्या नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याचं नाव येईल त्याची चौकशी केली जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असं म्हणत रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचे संकेत त्यांनी दिले.

अनिल देशमुख यांच्या चौकशीबाबत सीएम उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मंत्री आणि नेत्यांशी चर्चा केली. विषय गंभीर आहे. राज्य प्रमुख निर्णय घेतील, आम्ही सर्व कॅबीनेट, नेते त्यांच्या सोबत आहोत. तसेच शरद पवार यूपीए अध्यक्ष व्हावे का यावर मी बोलणार नाही? कारण केंद्राच्या विषयावर मी बोलणे योग्य ठरणार नाही. राज्यातील विषयावर मी बोलतो. केंद्रीय विषयावर बोलणारे आमचे वरिष्ठ नेते आहेच. याविषयावर सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि स्वत: पवारसाहेब बोलतील, असं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER