
नाशिक : सरकारं येतात, आणि जातात; सूडबुद्धीने कोणी काही करू नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत. कोरोनासंदर्भात (Corona) नाशिकमध्ये आज आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Ajit Pawar Criticism On Bjp Ed Action)
एका प्रश्नाच्या उत्तरात ईडीच्या (ED) कारवाईबाबत पवार म्हणालेत, तुम्हाला वाटते तेच मला देखील वाटते. सरकार येत असतात, जात असतात, सूडबुद्धीने कोणी काही करू नये. राजकीय हस्तक्षेप न होता कायद्याने कारवाई झाली पाहिजे. काहींना राजकारण करायचे आहे, त्याकडे सरकार दुर्लक्ष करते.
पार्थ पवारांबाबत (Parth Pawar) ते म्हणालेत, त्यांच्याबाबतची बातमी धादांत खोटी आहे. भालकेंच्या जागी पार्थ पवारांचे नाव नसेल, त्यामुळे हा विषय इथे बंद करा.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला