अजित पवार म्हणाले….तर बायको मला हाकलून देईल

मुंबई :- महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर मंत्र्यांचे बंगले मिळवण्यावरून चांगलेच मानापमान झाले होते. आपल्या दिलखुलास भाषणासाठी आणि वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रत्यय यावेळी आला. अजित पवार म्हणाले, बारामतीचे लोक जेव्हा मुंबईल येतात. तेव्हा मी थोडा नाराज होतो. कारण अद्याप देवगिरी बंगला मिळाला नाही.

मी भूमिका बदललेली नाही, उलट अनेकांनी भूमिका बदलून सत्ता स्थापन केली : राज ठाकरे

पवार म्हणाले ज्या घरात मी सध्या राहतो ते लहान पडते. तिथे बसायला जागा नाही. हॉलमध्ये गर्दी झाली की डायनिंग रुममध्ये बसायला लागते. तिथे गर्दी झाली की जयच्या बेडरुपमध्ये बसावे लागलेत. आता फक्त माझ्या बेडरुममध्ये बसायचे बाकी आहे. तिथे जर कार्यकर्त्यांसोबत बसलो तर बायको मला हाकलून देईल, अजित पवारांच्या या वक्तव्यावरून एकच हशा पिकला.