25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या ; राज्य सरकार केंद्र सरकारकडे मागणी करणार

Maharashtra Today

बारामती : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . 25 वर्षावरील ज्यांना सहव्याधी आहेत, अशा नागरिकांनाही कोरोना लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी लवकरच राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ते आज बारामतीत कोरोना आढावा बैठकीत बोलत होते.

कोव्हिड लस(Corona Vaccine) कोणाला द्यायची, हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकार घेत असतं. 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. तरी 45 वर्षाखालील ज्यांना डायबिटीजसारख्या अन्य व्याधी आहेत, त्यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे लवकरच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांना 25 वर्षावरील सहव्याधीग्रस्तांनाही लस उपलब्ध देण्याची विनंती करणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी इच्छा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी व्यक्त केली होती. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली होती.

दरम्यान येत्या एक एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button