अरे बाबा, त्याला कोरोना झाला असेल तर ? अजितदादांनी नाकारला कार्यकर्त्याचा पुष्पगुच्छ

Ajit Pawar

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सतत कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन सर्वांना करत असतात. कधी कधी ते नियमांचे पालन न करणाऱ्या कार्यकर्त्यांना चारचौघात चार खडेबोल सुनावण्यासदेखील मागेपुढे पाहात नाहीत, असेही अनेकवेळा घडले आहे. आजदेखील पुण्यात एका कार्यक्रमावेळी अजितदादांनी कार्यकर्त्याचे चांगलेच कान टोचले.

तसेच कोरोनाच्या भीतीने पुष्पगुच्छ नाकारला. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २१) कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेहमीप्रमाणे कार्यकर्ते अजित पवार यांची भेट घेण्यास आले होते. एक कार्यकर्ता दादांना म्हणाला, दादा, तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, अरे बाबा, काही तरी नियम पाळा, कोणाकडून पुष्पगुच्छ आणला? त्याला कोरोना झाला असेल किंवा नाय काय माहिती? पण जरा काळजी घ्या…असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार बैठकीसाठी पुढे निघाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button