
मुंबई : अजितदादांच्या (Ajit Pawar) जनता दरबारानंतर पत्रकारांनी ठाकरे सरकारमधील (Thackeray Govt) खातेवाटपाचा प्रश्न विचारला. तेव्हा या बातम्या मीडियातील आहेत असे अजित पवारांनी स्पष्ट केले .
खातेवाटपाबद्दल आमच्यात थोडीशीच काय, तसूभरही चर्चा नाही. त्यामुळे तुमचे सोर्सेस काय आहेत, ते मला कळू शकणार नाही, असा मिश्किल टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
खातेवाटप हा अधिकार तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा आहे. तिन्ही नेते यासंदर्भाचा निर्णय घेतील. हा निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असेल, असं अजित पवार म्हणाले. राज्य स्तरावर काम करणारे माझे सहकारी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यापैकी आमच्या कुणाच्या कानावर खातेवाटपाबाबत बातमी नाही, या बातम्या मीडियातील आहेत, तुमचे सोर्सेस काय आहेत, ते मला कळू शकणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला