अमेरिकेतील घटना निंदनीय, पण त्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा…: अजित पवार

Ajit Pawar - Washington US Capitol

मुंबई :- अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अमेरिकेत अजूनही राजकीय तणाव सुरु आहे. या निवडणूक २०२० मध्ये पार पडल्या . मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील (Washington) कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार गोंधळ घातला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यात चार आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप, ग्रामरक्षक दलाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

जगात अशाप्रकारचे हल्ले होणं निंदनीय बाब आहे. या घटनेचा धिक्कार केला पाहिजे. वेगवेगळी मतं विचार असू शकतात, सगळ्यांना एकाचेच विचार पटतील असे नाही. त्यालाच आपण लोकशाही म्हणतो. परंतु तिथे निवडणूक सुरू होती आणि निकाल लागला तेव्हापासूनच ऐकायला मिळत होतं की ट्रम्प यांना निकालच मान्य नाही. मतमोजणीला मानत नाही असे ते म्हणाले होते. तो त्यांचा अधिकार आहे. पण आपण त्याबाबत फार चर्चा करण्यापेक्षा आपल्या समस्यांना आणि प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : हेल्थ वॉचमुळे तुमचे ठिकाणही कळणार, अजित पवारांचे पोलिसांना चिमटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER