अजित पवार वेळेआधीच बैठकीला पोहोचले; अधिकाऱ्यांसह आमदार-खासदारांचीही पळापळ

Ajit-pawar-meeting-in-pune

मुंबई : पुण्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुणे विधान भवनात दाखल झाले. नेहमीप्रमाणे आजही अजितदादा वेळेआधी बैठकीला हजर झाल्याने अधिकाऱ्यांसह नेतेमंडळींचीही दमछाक झालेली पाहायला मिळाली.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉलमध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक आजोयित करण्यात आले .

या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार वंदना चव्हाण विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित आहेत.

पुण्यात कोरोना (Pune corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील प्रशासन तयारीला लागले आहे. आरोग्य विभाग तसेच महापालिकेकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येनुसार प्रशासनाची नेमकी काय तयारी आहे, याचा आढावा घेण्यासाठी अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER