राज्यपालांच्या प्रकरणावर मला काहीही माहिती नाही : जेव्हा पवारांचा आवाज चढतो!

मुंबई : राज्यपाल कोश्यारींना (Governor Bhagat Singh Koshyari) हवाई वाहतूक करण्याची परवानगी नाकारल्याने ठाकरे सरकार विरुद्ध नवा वाद निर्माण झाला आहे . त्याच वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्रकारांनी गाठलं. त्यांना ह्या प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांचा आवाज चढला.

राज्यपाल कोश्यारींवर अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले . ते कुठं व्यस्त होते हेही त्यांनी सांगितले . मंत्रालयात जाऊन पूर्ण माहिती घेतो आणि पुन्हा तुमच्याशी बोलतो असेही अजित पवार म्हणाले. त्यानंतर इतर काही प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली. काही प्रश्न झाल्यानंतर अजित पवारांना पुन्हा एका पत्रकाराने राज्यपाल प्रकरणावरच प्रश्न केला.

दम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज उत्तराखंडचा दौरा करायचा होता. पण राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगीच दिली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे राज्यपाल कोश्यारी हे विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचे कळाले . त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER