अजित पवारांनी साखर कारखान्याच्या कर्जाचे हमी पॅनेल सोडले

Ajit Pawar & Balasaheb Patil

मुंबई :- साखर कारखान्यांना कर्जासाठी हमी देण्याच्या पॅनेलवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ज्या पद्धतीने कुणालाही न कळू देता बाजूला झालेत त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पवार यांच्याजागी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पॅनेल साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी हमी देते.

सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमी देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी, सहकार खात्याने २ मार्च रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वात चार सदस्यांची समिती स्थापित केली होती. त्याच दिवशी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेत सहकारी साखर कारखान्यांना हमी देण्याबाबत कारखान्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी दुसरी समिती स्थापित करण्यात आली होती.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साखर कारखान्यांना कर्ज देण्याबाबतचा निर्णय अंतिम निर्णय अजित पवार याना घ्यायचा होता. राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी अनेक साखर कारखाने सरकारी हमी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक कारखान्यांनी कर्ज परत न केले नाही. सहकार खात्याने या कर्जाची हमी घेतली असल्याने बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी सरकारविरुद्ध कारवाई सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानंतर सरकारने या कर्जाचे १ हजार ४९ कोटी रुपये फेडले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जासाठी हमी मिळावी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेले साखर कारखाने दबाव आंत असतात. या कारखान्यांची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची असते. ते कर्ज परत करू शकत नाहीत. या स्थितीत अजित पवार यांनी कर्जाला हमी देण्याचे पॅनेल सोडले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘पुणे स्मार्ट सिटी’ ची कामे दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करा :   अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER