नारायण राणे मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण का नाही दिले, अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar - narayan rane - Maharashtra Today

पुणे :- शरद पवार (Sharad Pawar) चारवेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न विचारणारे नारायण राणेदेखील युती सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री होते. मग त्यांनी त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिले नाही, असा उलटप्रश्‍न उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला. आरक्षणासंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे हे राणे यांना कळत नाही का असा संतप्त प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.

नारायण राणे (Narayan Rane) यांनी आरक्षणाच्या विषयावरून गुरूवारी पुण्यात बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राणे यांच्या टीकेला पवार यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, नारायण राणे मुख्यमंत्री होते. आरक्षणसंदर्भातील समितीचे काम आमच्या सरकारनेच त्यांच्याकडे दिले होते. आता दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याची कल्पना राणे यांना नाही का ? एका बाजूला पवार साहेंबाबद्दल आदर बाळगायचा. अगदी त्यांच्या पायाचे दर्शन घ्यायचे आणि मागून अशी बदनामी करायची हे योग्य नाही. गेल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात पवार यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली आहे. आजही शरद पवार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत. टीका करणाऱ्यांनी याचे भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

राजगुरूनगरमधील राजकीय वाद चांगलेच टोकाला गेले आहे. शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा वाद तिथे निर्माण झाला आहे. मात्र, आम्ही सत्तेत एकत्र आहोत. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना तश्या सूचना केल्या आहे. शिवसेनेने त्यांच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगावे. या वादावर लवकरच तोडगा निघेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी असा थेट सामना विधानसभेला झाला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर संघर्ष आहे. मात्र, राज्य पातळीवर आम्ही एकत्र आहोत. तालुक्यताच्या पातळीवर त्यांच्यातही एकोपा होईल, असे पवार यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : कुणी माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, अजित पवारांचे विरोधकांना आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button