गुरुवारपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार, अजित पवारांचे आश्वासन

Ajit Pawar - ST Bus Services

मुंबई : कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली एसटी बसची सेवा (ST Bus Services) सुरू करण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यामुळे एसटी कर्मचारी हवालदील झाले आहे. अखेर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी याबद्दल ट्वीट करून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत मी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ट्वीट परब यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER