बाळासाहेबांचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजित पवारांनी केला निर्धार

Balasaheb Thackeray - Ajit Pawar

मुंबई :- आज शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा स्मृतिदिन. या दिवसानिमित्त त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी श्रद्धांजली वाहिली. ‘शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत श्रद्धांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे स्मृतिस्थळावर आलो आहे. यावर्षी मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न नियती आणि जनतेने पूर्ण केलं आहे. यामुळे यंदा विशेष महत्त्व आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. बाळासाहेबांचं आणखी एक स्वप्न होतं, की महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं पाऊल पुढे गेलं पाहिजे, हे आम्ही पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER