अजित पवार-पार्थ पवारांकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Ajit Pawar-Pm Modi-Parth Pawar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! महाराष्ट्राला तसंच समस्त देशवासियांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून सदैव होईल, अशी अपेक्षा आहे असे ट्विट अजित पवारांनी केले .

तसेच “आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या राष्ट्राची सेवा करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि उच्च आकांक्षा लाभोत.” अशा शुभेच्छा पार्थ पवार यांनी दिल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER