अजित पवार यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज

Ajit Pawar

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अखेर कोरोनावर (Corona) मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना कोरोनाचे सौम्य लक्षण जाणवत होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

२६ ऑक्टोबर रोजी अजित पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती आता सुधारली असून आज त्यांना सुटी देण्यात आली आहे. मात्र अजित पवार आठवडाभर घरातच विश्रांती करणार आहेत. तर दुसरीकडे  राष्ट्रवादीचेच खासदार सुनील तटकरे यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात येताच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER