माझा फोटो दिसला तर लोक लस घ्यायला येणार नाहीत: अजित पवार

Ajit Pawar

पुणे :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनेक नेते सोशल मीडियावर (Social Media) फोटो टाकतात. पण माझा फोटो टाकला तर जे लोक येणार आहेत, तेदेखली लस घेण्यासाठी फिरकणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

इतर नेते कदाचित लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लस घेतानाचे आपले फोटो शेअर करत असतील. पण मी लस घेतानाचा माझा फोटो टाकला तर लोक अजिबात लसीकरणासाठी फिरकणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. ते शुक्रवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

एक मार्चपासून देशभरामध्ये ६० वर्षांवरील नागरिक आणि इतर व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासहीत अनेक मान्यवरांनी लस घेतानाचे फोटो पोस्ट करत लस सुरक्षित असून पात्र असणाऱ्या सर्वांनी या लसीकरणामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं होतं. मात्र अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये अशाप्रकारे लस घेताना फोटो काढणं हे नौटंकी असल्याचा टोला लगावला आहे. अशी नौटंकी आपल्या आवडत नसल्याने आपण लस घेताना फोटो काढला नाही असा खुलासा अजित पवारांनी केला.

ही बातमी पण वाचा : नियम पाळा , पुण्यात तूर्त लॉकडाऊन नाही, पण…; अजित पवारांचा  इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER