‘दादा मास्क काढा !’ भाषणादरम्यान चिठ्ठी; अजित पवार म्हणाले…

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील (Pandharpur-Mangalvedha by-election) राष्ट्रवादीचे (NCP) उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गेले होते . अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा प्रचार केला. यावेळी भाषण करताना अजित पवारांना “मास्क काढा” (Mask) असे लिहिलेली चिठ्ठी आली. त्यावर अजितदादांनी “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा.” असे मिस्कील भाष्य केले.

पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. अजित पवार भाषण करत असताना त्यांना एक चिठ्ठी आली. त्यावर “मास्कमुळे आवाज येत नाही, दादा मास्क काढा. ” असं लिहिलेलं होतं. कार्यकर्त्याने पाठवलेली ही चिठ्ठी अजित पवारांनी भरसभेत जाहीर वाचून दाखवली. “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा म्हणून!” असे अजितदादा म्हणताच एकच हशा पिकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button