पवारांच्या मार्गदर्शनामुळे सरकारला कुठलाही धोका नाही, अजित पवारांचा दावा

Ajit Pawar-Sharad Pawar

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विधानसभा अध्यक्षाची निवडणूक (Election of Assembly Speaker) घेण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाने अथवा आवाजी मतदान करायची याबाबत तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील. आज आमच्याकडे १७० आमदारांचे पाठबळ असल्याने या सरकारला कुठलाही धोका नाही. शरद पवारांसारख्या (Sharad Pawar) नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे महाविकास आघाडी सरकारने सवा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढेही त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहणारच आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज केला. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर झालेल्या सोहळ्यात सहभागी झाल्यावर ते बोलत होते.

यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य करत पोलीस विभाग योग्य चौकशी करत असल्याचे सांगितले. संजय राठोड हे गायब नाहीत. पोलिसांना जर वाटलं तर ते राठोड यांचीही चौकशी करतील. ते प्रसारमाध्यमांसमोर येत नाही अशी तुमची ओरड असते. यापुढे त्यांची भेट झाली तर त्यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी नक्की सांगेन, असे म्हणत त्यांनी पत्रकारांनाच चिमटा काढला.

सध्या आम्ही सत्तेवर असल्याने विरोधी पक्षातील नेते आपले काम घेऊन आमच्याकडे येत असतात. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा आम्ही त्यांच्याकडे जात असो. त्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठींवर चर्चा रंगवू नये, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER