
अमरावती : वीज बिलाच्या मुद्द्यावर अदानी यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांनी वीज बिलावरुन यू टर्न घेतला, अशी टीका मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. या गोष्टीत तिळमात्रही तथ्य नाही. काही लोक बोलत असताना अशा मान्यवरांची नावं घेतात, की त्यातून बातम्या होतात” अशी टीका राज ठाकरेंचं नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. अमरावतीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, वास्तविक पाहता पवार साहेबांचा या राज्याशी 60 वर्षांपासूनचा संबंध आहे. त्यामुळे पवार साहेब असं कधीच करू शकत नाहीत. केवळ बातम्या प्रसिद्ध होण्यासाठी काही जण शरद पवारांवर टीका करत असतात, असं अजित पवार म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला