पंतप्रधान महाराष्ट्रात आले असते तर बरं झालं असतं; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

पुणे : चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केवळ गुजरातची निवड का केली? असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) केला जात आहे. या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता खंत व्यक्त केली. पंतप्रधानांनी केवळ गुजरातलाच मदत जाहीर केली असून महाराष्ट्राचा दौरा रद्द केला. गुजरातचा मदतीचा प्रस्ताव नसतानाही मदत केली. जसं गुजरात राज्य आहे. इथं आले असते, मदतीचा आकडा जाहीर झाला असता तर बरं वाटलं असतं, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. पुण्यामध्ये आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले, वादळ होतं त्यावेळी मी नियंत्रण कक्षात बसून होतो. कुठे कुठे नुकसान झालं माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात होतो.

पालकमंत्र्यांनी तिथं दौरे केले. तुलनात्मक या वादळाची तीव्रता कमी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आला होता; पण तो दौरा रद्द झाला. नंतर ते थेट गुजरातला गेले. महाराष्ट्र पण भारतातीलच राज्य आहे, जसं गुजरात राज्य आहे. महाराष्ट्रात येऊन मदतीचा आकडा जाहीर केला असता तर बरं वाटलं असतं, असे पवार म्हणाले. दरम्यान नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या जीआरबाबतच्या वादाबाबत विचारल्यावर पवार चिडले. त्यावर ‘मला नितीन राऊत यांनी काय वक्तव्य केलं त्याबाबत माहीत नाही. जीआरबाबतही मला माहीत नाही. त्यांनी काय सांगितलं ते मला माहीत नाही.’ असं पवार चिडून म्हणाले. पवार चिडल्याचं पाहून पत्रकारही क्षणभर अवाक् झाले. हाय कोर्ट जो काही निर्णय देत असतं ते ऐकावं लागतं. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत अजून अंतिम निर्णय आला नाही. कोणावरही अन्याय होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ. महाविकास आघाडीची भूमिकाही तीच आहे. सरकार दुर्लक्ष करतंय असं चित्र होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ, असंही ते म्हणाले. संभाजीराजे यांनी सारथीबाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. संस्थेला जागा नव्हती ती उपलब्ध करून दिली.

आता मदत दिली जात आहे. जलसंपदा विभागाची जागा पण देत आहे. माझी आणि त्यांची भेट झाली तर मी त्यांना माझ्यावर जबाबदारी आल्यावर मी काय काय केलं हे सांगेन. दरम्यान दहावी परीक्षेबाबत कोर्टाच्या ताशेऱ्यांवर विचारलं असता अजित पवार म्हणाले, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही याची काळजी घेतली जाईल. मुलांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ. दहावीच्या परीक्षेबाबत कोर्टाने काय म्हटलं हे बघावं लागेल. शिक्षण विभागाशी चर्चा करावी लागेल, कोर्टाचा अवमान होणार नाही हे बघावं लागेल. तसेच पुण्यात निघालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्कार रॅलीबाबत बोलताना ते म्हणाले, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालं तिथं पोलिसांवर पण कारवाई झाली. स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नाही तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईला मागे-पुढे बघितले जाणार नाही. मोटरसायकलचे नंबर बघून त्यांच्यावर कारवाईदेखील कारवाई केली.

ही बातमी पण वाचा : मेंढ्यांचे नेतृत्व लांडग्याकडे कसे? पदोन्नती आरक्षणावरुन गोपीचंद पडळकर यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button