गुजरातला १ हजार कोटी, योग्य वाटेल तेवढे तरी महाराष्ट्राला द्या; अजित पवारांचा मोदींना टोमणा

Ajit Pawar-PM Modi

मुंबई : ‘तौत्के’ चक्रीवादळात (Tauktae cyclone) झालेल्या नुकसानभरपाईसाठी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) गुजरातला १ हजार कोटी दिलेत. तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी महाराष्ट्राला द्या, असा टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांनी मारला.

आज मुंबई मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ ची चाचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर नेते उपस्थित होते.

एमएमआरडीच्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भाषणात म्हणालेत – राज्याची कोणती काम, मागण्या असतील तर सांगा मी त्या केंद्रापर्यंत पोहोचवून कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करतो.

अजित पवार यांनी रामदास आठवले यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत दोन महत्वाच्या मागण्या करत मोदी सरकारवर टीका केली. पवार म्हणालेत – माझी रामदास आठवलेंना एवढीच विनंती आहे की तुम्ही केंद्रात आहात तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवण करुन द्या तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा मोदींनी केवळ गुजरातचा दौरा केला आणि तातडीनं १ हजार कोटींची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्रात ते का आले नाहीत? हे अद्याप काही कळाले नाही. गुजरातला १ हजार कोटी दिलेत. महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या, असा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button