मानाच्या दहा पालख्यांना आषाढीवारीची परवानगी; अजित पवार

Ajit Pawar

पुणे :- आषाडी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) राज्यभरातू पालख्या निघतात. पण, कोरोनाच्या (Corona virus) साथीच्या निरबंधांमुळे गर्दी टाळण्यासाठी पालख्यांच्या वारीला बंदी टाकण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणालेत की, कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची एक बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक झाली, त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र विठ्ठल मंदिर बंदच राहणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षी आषाढीवारी निर्बंधात स्वरुपात होणार आहे. कोरोनामुळे सलग २ वर्षं पंढरीची वारी नेहमी प्रमाणे होणार नाही.

यंदा पालखीच्या प्रस्थानासाठी देऊ आणि अळंदीमध्ये १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित ८ पालख्यांच्या वारीत प्रत्येकी ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यंदाही प्रत्येकी २ बसमधून मनाच्या पालख्यांना रवाना होणार आहेत. मानाच्या पालख्या वाखरीमध्ये पोहोचल्यावर दीड किलोमीटर प्रतीकात्मक पायी वारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शासकीय महापूजा गेल्या वर्षीप्रमाणेच होणार आहे. सर्व सहभागी वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button