पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

मुंबई : पंढरपूर (Pandharpur) शहरातील चंद्रभागा नदीकडेला (Chandrabhaga river) नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. या दुर्घटनेची दखल घेत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे .

पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातील पूरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली.

घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे. मंगेश गोपाळ अभंगराव(वय ३५), राधाबाई गोपाळ (वय ५०), पिलू उमेश जगताप (वय १३), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय ७०) आणि दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER