
मुंबई : एमपीएससीची (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे गुरुवारी पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. यावरून चांगलेच वादंग पेटले होते . पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) ‘एमपीएससी’च्या परीक्षांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवार म्हणाले, मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही, या त्यांच्या मिस्कील टिप्पणी केली.
माझ्या मते एमपीएससीचा विषय आता संपलेला आहे. काल जे काही घडले ते दुर्दैवी होते. विद्यार्थ्यांच्या संताप आणि भावना योग्यच आहेत; पण काही जण त्यात राजकारण करू पाहात आहे; पण आम्ही विद्यार्थ्यांबरोबर आहोत. काल मुख्यमंत्र्यांनीदेखील एमपीएससीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांच्या वयाच्या अटीबाबत निर्णय घेणार असल्याचेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांसाठी जे काही करायचे ते सरकार करणारच आहे. एमपीएससीने आज जाहीर केलेल्या २१ तारखेला परीक्षा होणार आहे. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असेही पवार म्हणाले. दरम्यान अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात शुक्रवारी (दि.१२) कोरोना आढावा बैठक होत आहे. यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पवार नेमके कुठले पाऊल उचलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. या बैठकीला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, महापौर हे उपस्थित आहे. या बैठकीत शहरातील सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेत निर्णय घेतल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला