अजित पवार म्हणतात – मविआने एकोप्याने राहायचे ठरवले पण, एकोपा खालपर्यंत पोहोचायला वेळ लागेल

Ajit Pawar on mahavikas aghadi govt

पुणे : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकोप्याने राहायचे ठरवले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील आम्ही देखील एकोप्याने राहतो पण, हा एकोपा खालपर्यंत पोहोचायला वेळ लागेल, असे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आघाडीतील बेबनाव झाकण्याचा प्रस्य्त्न केला.

आज पुण्यात ते म्हणालेत की, जिथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना किंवा शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत झाली तिथं एकत्र बसून निर्णय घ्यावे लागतील. रायगडमध्ये आम्ही मार्ग काढला. आमच्याकडून जयंत पाटील आणि मी आणि त्यांच्याकडून उद्वव ठाकरे मार्ग काढतील, महापालिका निवडणुकीमधे प्रभाग रचना कशी असेल याबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ.

लॉकडाऊनसंदर्भात
काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अनलॉकच्या विधानाने उडालेल्या गोंधळाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा एक शब्द चुकला, असे सांगितले म्हणून आम्ही या फंदात जास्त पडत नाही, असा टोमणा त्यांनी मारला. राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनच्या बाबतीत जो निर्णय घेतला तोच अंतिम आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे निर्बंध शिथिल करण्याबाबत सोमवारी निर्णय घेऊ.

पुणे आणि पिंपरी चिंचवडचा पॉझिटीव्हीटी रेट पाच टक्क्यांहून कमी आहे. मात्र इतर जिल्ह्याचा जास्त आहे. त्यामुळे वेगवेगळे निर्णय घेतले जातील. दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन सोमवारी पुण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button