…तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवारांची माहिती

Ajit Pawar

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सर्वच प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेत अपयश आल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तास्थापनेच्या दृष्टीने सोनिया गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत १९ नोव्हेंबरला भेट होणार आहे.

त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल आणि सत्तास्थापनेसाठी जोपर्यंत १४५ च्या पुढे आकडा जात नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे . बारामती येथे एका कार्यक्रमानंतर अजित पवार यांना सत्तास्थापनेची गोड बातमी केव्हा येणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली. तसेच आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या निवडणुकीत अनेक जण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने, फुटाफूट होणार नाही.

बाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ

काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे साताऱ्यातील निकालावरून सगळ्यांना पाहिलं आहे. त्यामुळे आता कुणी असं करणार नाही. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरू झालेल्या सत्तास्थापनेच्या राजकीय रणधुमाळीत सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार केंद्रस्थानी आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे .