इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या… आता कसं गार गार वाटतं ; अजित पवारांचा भाजपाला चिमटा

मुंबई : भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचे मी म्हटलेले नाही. काळजी घ्या तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली…सरकार येणार नाही, आपली कामं होणार नाहीत यासाठी ते गेले. तिथं कामं होत नसतील ते परत दुसरीकडे जातील एवढंच म्हटले . तीन चार महिन्यात काही गोष्ट घडू शकतात असं म्हटलं तर त्यांना राग आला. त्यांनी इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होते …आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागले आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपावर (BJP) उपहासात्मक टीका करताना काही नेते संपर्कात असल्याच्या दाव्यासंबंधी टीकास्त्र सोडले आहे .पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER