‘ही’ लढाई आपण नक्की जिंकू : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोनाच्या संकटाशी आपण सर्व मिळून विविध माध्यमांतून लढत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा:- सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही – अजित पवार

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्युदर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या. दरम्यान गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपी उपयुक्त ठरेल, असेही पवार म्हणाले .

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच कोरोना विषाणूची भीती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER