कोरोना कुणालाच सोडत नाही… ना दादाला ना मामाला

पुणे :- जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी कित्येक महिने सरकारने लॉकडाऊन ठेवले. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. कोरोनाला हरवण्यासाठी सरकारने त्यावर व्हॅक्सिनसुद्धा काढले. बऱ्याच महिन्यांनंतर आता कोरोना संसर्गाच्या प्रमाणात घट झाली असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कोरोनाची लागण झाली. “काळजी घ्या, इथे कुणीच मास्क लावलेला दिसेना. कोरोना कुणालाच सोडत नाही. ‘ना दादाला ना मामाला’ दादालाही कोरोनाने सोडले नाही.” अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच अजित पवार हे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते इंदापूर नगरपरिषदेच्या ३३ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ झाला. “राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी आपली कामे सुरूच राहिली पाहिजेत.” असे ते म्हणाले. कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द झाले. यामुळे सगळ्यांचेच मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला. यामुळे अजूनही खबरदारी घेण्याची गरज आहे, असे म्हणत पुन्हा एकदा त्यांनी कोरोनाच्या खबरदारीबाबत जनजागृती केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER