पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांचे काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात आहेत. यामध्ये पुण्याचाही समावेश आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक शहरांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील स्थितीसंबंधी माहिती दिली असून लॉकडाउनसंबंधीही भाष्य केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संकट वाढू लागलं आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये प्रमाण वाढलं आहे. पालकमंत्री नात्याने उद्या पुण्यात लोकप्रतिनिधींना बोलावालं असून दर शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असते. या बैठकीत आम्ही निर्णय घेतो. लॉकडाउनसंबंधी मतांतर आहे, पण नियमांचे पालन केले पाहिजे यावर एकमत आहे,” से अजित पवार यांनी म्हटले आहे.

आम्ही ४५ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण करण्याची मागणी केली होती ती मान्य झाली आहे त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. पण आता ४५ च्या आतील अनेकांना कोरोना होत आहे. देवगिरी जिथे मी राहतो तिथे अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत. काल सगळ्यांची तपासणी केली तर नऊ लोक पॉझिटिव्ह होते. आपल्याला कोरोनाचा मुकाबला करावाच लागणार आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून आर्थिक मदत कम कमी पडू न देण्याची भूमिका आहे, असे अजित पवारांनी सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘आमच्याकडे बहुमत’, राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या भाजपला अजितदादांनी खडसावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER