एक जण म्हणायचे मी पुन्हा येईन आता दुसरे म्हणतात मी परत जाईन, अजित पवारांचा टोला

Ajit Pawar-Chandrakant Patil-Devendra Fadnavis

पुणे :- राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार आले नाही. त्यामुळं ते अस्वस्थ झाले आहेत. एक जण म्हणायचे मी पुन्हा येईन आता दुसरे म्हणतात मी परत जाईन, मग आले कशाला, असा खरमरीत टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे प्रसादेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) लगावला. आज पुण्यात विविध बॅंकांतर्फे देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले. निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामं व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं, असा टोला त्यांनी लगावला.

कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोना लस (Corona Vaccine) पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, पॅरामेडिकल फोर्स आणि पोलीस यांना देण्यात येईल. कोरोनाचा धोका टळलेला नाही. नव्या विषाणूमुळे धोका कायम आहे. मास्क वापरणं, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं, सॅनिटायझर वापरणं गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन भाजपला लक्ष्य केले. एवढ्या थंडीतही शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. त्यांना केंद्राकडून कुठलीही विचारणा होत नाही. केंद्र सरकारने निदान शेतकऱ्यांचे म्हणणेऐकून घ्यावे आणि त्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER