शाळा सुरू झाल्या आता शुक्रवारी जिल्हा परिषदेत ‘दादां’ची शाळा भरणार

पुणे : कोरोनामुळे (Corona) गेलं वर्षभर मुलांच्या शांळा बंद होत्या. सर्व वर्ग ऑनलाईन सुरू होते. शिक्षकांना ऑनलाईन मुलांची शाळा घेणे अनिवार्य केले होते. आता शाळा (Schools) सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अधिका-यांची शाळा घेणार आहेत. त्यामुळे अधिका-यांची लगबग सुरू झाली आहे.

आतापर्यंत ऑनलाई काम होत होतं. आता प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेणार असल्यामुळे ‘गृहपाठ’ (विभागाच्या माहितीचे पीपीटी) तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेत अधिकारी (Zilla Parishad school )आणि पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या कामाची पद्धत लक्षात घेता, सर्व विभागांकडून माहिती गोळा करून त्याचे सादरीकरण करण्याची तयारी दिवसभर सुरू होती. यावेळी पूर्व उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षातील यशस्वी विद्यार्थ्यांना पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

त्यामध्ये इयत्ता पाचवीतील 58, तर इयत्ता आठवीतील 48 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आणि दोन महिन्यांतच कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व जग थांबलं. संचारबंदी आणि कोरोनाच्या संकटात निधी नाही, विकासकामे नसल्यामुळे पदाधिकारी कोरोनाच्या कामातच अडकले. आता विकासकामांना सुरुवात झाली असून, निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र, नवीन पदाधिकाऱ्यांकडे आता केवळ अकरा महिने राहिले. या अकरा महिन्यांत जिल्ह्याच्या विकासकामाला गती देणे हीच पदाधिकाऱ्यांची खरी परीक्षा आहे. त्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत जिल्हा परिषद कामकाजाचा आढावा घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER