अजित पवार पुन्हा कबड्डीच्या मैदानात

Ajit Pawar

मुंबई : उउपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा दुसऱ्यांदा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. अजित पवार यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांची महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी २८ वर्षे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले होते. तर सप्टेंबर २००५ ते २३ मार्च २०१३ या काळात कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा अजित पवारांकडे सोपवण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER