गोपीनाथ मुंडे वारल्यावर पवार साहेबांनी उमेदवार दिला नव्हता; कारण…

Ajit Pawar-Dhananjay Munde-Pankaja Munde

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्याच्या दौ-यादरम्यान विधानसभेसाठीचे उमेदवार घोषित केलेत. त्यानंतर बालविकास मंत्री, आमदार पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना निशाणा करणे सुरू केले. बारामतीचे लोक दिवंगत मुंडेंच्या विरोधात आता ऊभे ठाकले आहेत. त्यांना बीडकरांनी त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन पंकजा मुंडेंनी बीडवासीयांना केले.

ही बातमी पण वाचा:- पक्षप्रवेशावर अजित पवार म्हणाले, काट्याने काटा काढणार …अन् शेवट आम्ही करणार

स्वतः शरद पवारांनी बीडमध्ये उमेदवार घोषित केल्यानंतर पंकजांनीही तेथे फोडाफोडीचे राजकारण केले आणि नमिता मुंधडा यांना भाजपच्या तंबूत सामिल करून घेऊन राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार त्यांनी फोडला. या सगळ्यांमागचं मुख्य कारण काय तर, गोपीनाथ मुंडें गेल्यानंतर राष्ट्रवादीने येथे आपला कोणताही उमेदवार दिला नव्हता मात्र, आता राष्ट्रवादीने मुंडेंच्या विरूद्ध मुद्दाम मुंडेंनाच उमेदवारी देऊन राष्ट्रवादी कुटील डाव खेळत असल्याचे पंकजा मुंडेंचे म्हणणे आहे. अशा चर्चांना बीडमध्ये आहेत. या चर्चांनाही पुर्णविराम देत पंकजांच्या या गैरसमजावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार म्हणाले, गोपीनाथ मुंडे वारल्यावर पवार साहेबांनी उमेदवार दिला नव्हता. मात्र ही पंचवार्षिक निवडणूक आहे. इथं वेगळी परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा:- पंकजा मुंडेंना विजयाची खात्री नसल्याने नमिता मुंदडांना भाजपात घेतले : धनंजय मुंडे 

तसेच, सातारा लोकसभा निवडणूक पृथ्विराज चव्हाण लढवणार नसतील तर ती जागा राष्ट्रवादीची असल्यानं आम्ही लढवणार आहोत, लवकरच उमेदवार जाहीर होईल, असे ते म्हणाले. आघाडी इस बार 175 पार असे सांगताना अजित पवार म्हणाले की, बारामतीचा उमेदवार कमीत कमी एक लाख मतांनी निवडून येईल. गोपीचंद जबाबदार कार्यकर्ते आहेत, तुल्यबळ उमेदवार आहेत, असेही ते म्हणाले.