अजित पवारांनी ‘गोकुळ’साठी केली मोठी घोषणा

Ajit Pawar Maharastra Today

कोल्हापूर : कोल्हापूरमधील ‘गोकुळ’ (Gokul)दूध संघाला मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी सिडकोची पाच एकर जागा देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सत्तांतरानंतर गोकुळ दूध संघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने अजित पवारांची( Ajit Pawar) भेट घेतली, त्यावेळी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत, असे सूतोवाच काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विजयानंतर केले होते.

मार्केटिंग आणि दूध विक्रीसाठी नवी मुंबईत वाशीमध्ये जागा निश्चित करण्याचे आदेश अजित पवार यांनी सिडकोला दिले आहेत. सत्तांतरानंतर गोकुळ संचालक मंडळाने घेतलेल्या भेटीवेळी अजित पवार यांनी जागेसंदर्भात घोषणा केली. नव्या जागेमुळे मुंबईतही गोकुळचा व्यवसाय वाढणार आहे. संचालक मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही यावळी भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button