अजित पवारांनी राष्ट्रवादीचा विश्वास गमावला – गोपीचंद पडळकर

Gopichand Padlkar & Ajit Pawar

मुंबई :- भाजपचे अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांसारख्या नेत्यांनी केला आहे. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे.

तो परत मिळवण्यासाठीच ते अशा प्रकारचे दावे करत सुटल्याची टीका पडळकर यांनी टीव्ही-९ मराठीशी बोलताना केली. “अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. ” असा खोचक टोला पडळकरांनी लगावला आहे.

भाजपला (BJP) सत्ता ही लोककल्याणासाठी हवी असते. तर महाविकास आघाडीतील नेत्यांना सत्ता ही स्वत:च्या कल्याणासाठी हवी असते. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील कोणताही नेता सांगत असला तरी भाजपचा एकही आमदार फुटणार नाही. तुरुंगातील सतरंजीवर झोपण्यापेक्षा तुम्हाला विश्वासघातानं राजगादी मिळाली आहे. ती गादी सांभाळा आणि लोककल्याणासाठी सत्तेचा वापर करा, असा सल्लाही पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.

ही बातमी पण वाचा : तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबऱ्या अन् चमचा म्हणू शकतो पण… ; पाडळकरांचे संजय राऊतांना सणसणीत पत्र 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER